सिल्लोड, (प्रतिनिधी) : उमेद महाराष्ट्र शासन ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिल्लोड पंचायत समिती येथे जय भवानी महिला बचत गट, वांगी यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवासाठी तयार केलेल्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीचा शुभारंभ पंचायत समिती सभापती तसेच गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या हस्ते करण्यात आला.
महिला बचत गटांनी स्वनिर्मित केलेल्या आकर्षक व पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीना प्रोत्साहन देण्यासाठी
सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिला बचत गटांकडूनच गणेशमूर्ती खरेदी कराव्यातनअसे आवाहन पंचायत समिती यांनी केले.
श्रीगणेश मूर्ती बचतगट महिलांच्या स्वावलंबनाला चालना देत त्यांच्या कला कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- अनिता सुरेश बनकर, पंचायत समिती, सभापती, सिल्लोड















